Indo-China Border : अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या घुसखोरीचा डाव भारताने उधळला
अरुणाचल प्रदेशमध्ये चीन सैन्यानं घुसखोरी करण्याचा केला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही देशांच्या सैन्यात झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु दोन्ही देशांमध्ये झालेल्या झटापटीत भारतीय सैन्याने 200 चीन सैनिकांना पिटाळून लावलं आहे. अरुणाचलच्या तवांग भागात ही घटना घडल्याचे समजतंय.