Sharad Pawar on Vidhan Sabha Election : 84 होवो, 90 होवो हे म्हातारं काही थांबत नाही

Continues below advertisement

Sharad Pawar on Vidhan Sabha Election : 84 होवो, 90 होवो हे म्हातारं काही थांबत नाही

 तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचंय, 84 होवो की 90 होवो हा म्हातारा काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय थांबत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फलटण येथील सभेत केले होते. आता शरद पवारांच्या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पलटवार केलाय.  रामदास कदमांची शरद पवारांवर टीका  रामदास कदम म्हणाले की, शरद पवार यांनी शंभरी गाठावी. पण, 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं. तुम्ही अनेक पावसाळे पाहिलेत. तुमच्या हुशारीमुळेच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली. उध्दव ठाकरे काँग्रेसची साथ सोडायला तयार होते. शरद पवार यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली. बाळासाहेब हयात असताना जे शरद पवार यांना जमलं नाही ते शरद पवार यांनी आता करून दाखवलं, असा पलटवार त्यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.    टोलमाफीचा निर्णय लोकाभिमुख मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबत विचारले असता रामदास कदम म्हणाले की, टोलमाफीचा निर्णय लोकाभिमुख आहे. कोकणातली जनता सरकारवर आणखी खुश झाली आहे. लोकांचे हजारो रुपये वाचतील, असे निर्णय घेण्यासाठी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे त्यांनी म्हटले आहे.   

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram