Sharad Pawar Full PC : दावोसला उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी ?
Sharad Pawar Full PC : दावोसला उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी ?
एकीकडे महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून (Maharashtra Guardian Minister List) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एकनाथ शिंदे यांना हटवून महायुतीत लवकरच नवा 'उदय' होईल, असा अंदाज वर्तवला होता. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला आता शिंदेंची गरज नाही. सामंत यांच्या सोबत दावोसमध्ये 20 आमदार असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. तर उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार, 10 माजी आमदार आणि काँग्रेसचे 5 आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटत प्रवेश करतील, असा मोठा दावा केलाय. तर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, असे म्हटले. महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिश्कील भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. याबाबत विचारले असता आम्ही वाट बघतोय. मी त्याचीच वाट बघतोय की हे कधी जातात पक्षातून, असे मिश्कील भाष्य त्यांनी केले. शरद पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.