Sharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही
Sharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही
निवडणुकीमधे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे 1967 साली त्यावेळच्या मतदारांनी मला निवडून दिलं, त्यातील काही मला इथे दिसताहेत 50-55 वर्षं होऊन गेली..मी मुख्यमंत्री, राज्यमंत्री झालो,.संरक्षण खात्याचं काम केलं. आता मी राज्यसभेत आहे.. एक गोष्ट लक्षात ठेवा की मी आता ठरवलं आहे की आता लोकसभा नाही 30-35 वर्षं सतत निवडून गेल्यावर आता मी ठरवलं.. तसंच 25 वर्षांपुर्वी मी निर्णय घेतला की आता विधानसभा नाही..त्यामुळे मी सगळी जबाबदारी अजितदादांवर दिली आता पुढच्या तीस वर्षांची जबाबदारी नव्या नेतृत्वावर द्यायची आहे लष्करामधे मुलींना संधी देण्याची गरज आहे हे संरक्षणंमंत्री म्हणून मी सुचवलं..आता मुली लष्करात देशाची सेवा करतायत राज्याच्या राजकारणात 50 टक्के महिलांना आरक्षण देणं आवश्यक आहे हे ही मलाच वाटलं होतं.. याच कारण असं की पुरूषांप्रमाणेच महिलांनाही खांद्याला खांदा लावून समाजात काम करतात गेल्या 30 वर्षांची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनी पाण्याच्या प्रश्नकडे लक्ष देणं आवश्यक होतं हे काम त्यांच्याकडून झालं नाही. पाण्याची योजना मंजूर झाल्यानंतर एका दिवसात त्याची अंमलबजावणी होत नसते नवीन पिढीचा प्रतिनिधी देणं आवश्यक आहे. अजून माझा राज्यसभेचा दीड वर्षांचा काळ शिल्लक आहे...त्यानंतर राज्यसभेत जायचं की नाही ते मी ठरवेन किती वर्षं निवडणुका लढायच्या तुम्ही असे लोक आहात की सारखं जिंकून देता..एकदाही हरू दिलं नाही याचा अर्थ असा नाही की मी समाजकारण सोडलं..हा निर्णय़ माझा स्वतःपुरता आहे राज्याचा चेहरा बदलला पाहिजे, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे..त्यासाठी नवीन पिढी तयार केली पाहिजे ज्यांना सत्ता दिली आहे, त्यांचं राज्यावर लक्ष नाही हे माझं स्पष्ट मत आहे राज्यावर लक्ष दिलं पाहिजे म्हणजे काय - शेती, शेतीसाठी पाणी, खतं, शेतमालाला भाव हे सगळं पाहिजे राज्यात काम करणाऱ्या प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे..जे आम्ही केलं आहे. या दोन गोष्टीसाठी योग्य नेतृत्व निवडून देणं आवश्यक आहे.. पुण्यामधे टेल्कोचा कारखाना आहे जिथे ट्रक तयार होतात..हजारो लोक कामाला आहेत..गेली अनेक वर्षं कामाला आहेत. मात्र आता असं झालंय की नव्याने उद्योग इथे येतच नाहीत..जे येतात ते सगळे निघून जातात नागपुराात टाटा एअरबसचा कारखाना होता, तो निघून गेला आणि नंतर त्याचंं बडोद्यामधे उद्घाटन झालं तसाच वेदांता फॉक्सकॉनचा कारखाना महाराष्ट्रातून बाहेर गेला.. हे थांबवायचं असेल तर इथे सत्तापालट झालंचच पाहिजे तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात..गुजरातचे नाही...तुम्ही एका राज्यासाठी काम करू शकत नाही आणि तुम्हाला एका राज्याच्या विकासासाठी काम करायंचंंअसेल तर त्या राज्याचे मुख्यमंत्री व्हा माझी काहीच हरकत नाही एमआयडीसी कशासाठी आहे, जास्त हाताला काम..अशी जबाबदारी घेऊन जे काम करतील असे लोक विधानसभेत हवे आहेत..आमदार झाले पाहिजे. मी खात्री देतो की युगेंद्रसारख्या तरूणााला तुम्ही निवडून दिलं तर या जबाबदाऱ्या घेऊन तो सगळी कामं पार पाडेल राज्य आलं तर ते राज्य आपल्या माणसांच्या हातात येईल..