Mumbai Cruise drug Case: Sharad Pawar on Nawab Malik: शरद पवारांकडून नवाब मलिकांचे समर्थन;म्हणाले...

Continues below advertisement

Sharad Pawar : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून तपास यंत्रणांच्या विरोधात पुरावे सादर करत आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर त्यांनी वांरवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपास यंत्रणाचा भाजप वापर करत असल्याचेही मलिकांनी अनेकदा आरोप केले. त्यावरुन भाजपनं राष्ट्रवादी आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. नवाब मलिक यांना टीकेचाही सामना करावा लागला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिकांच्या या कामाचं समर्थन केलं आहे. दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली. तसेच नवाब मलिकांच्या कामाचं कौतुकही केलं.   

दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.याप्रसंगी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ‘अधिकारांचा गैरवापर जिथं होत आहे त्याला एक्सपोज करण्याचं काम नवाब मलिक करत आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर भारत सरकारने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गैरप्रकार रोखणे आवश्यक आहे, असं म्हणत शरद पवार यांनी नवाब मलिक यांचं समर्थनं केलं. सीमित कार्य काळाकरता ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी या सत्तेचा गैरवापर कसा केला हे सगळ्या जनतेने पाहिलं आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप करत आहेत, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही,’ असा टोलाही यावेळी शरद पवार यांनी लगावला. देशात भाजपाला पर्याय उभा करण्याच्या दिशेने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचं सूचक विधान यावेळी शरद पवार यांनी केलं.

भाजपच्या महाविकासआघाडी विरोधातल्या ठरावावर शरद पवार यांनी दिल्लीत खरपूस टीका केली. भाजपच्या राज्य कार्यकारिणीतला कालचा ठराव हा हास्यास्पद असल्याचं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. सकाळी वर्तमानपत्रात या बद्दल वाचलं तेव्हा एक जोक ऐकल्याचा आनंद झाल्याची खोचक टीका शरद पवार यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून भाजपसोबत काम केलेले सहकारी आता आमच्या बाजूला येत असल्याचं पवार यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram