Sharad Pawar On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामर्गाची स्तिथी मान खाली घालायला लावणारी
Sharad Pawar On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामर्गाची स्तिथी मान खाली घालायला लावणारी
चिपळूण मध्ये आल्यानंतर काही लोकांची आठवण..... बाळासाहेब सावंत यांचा शरद पवार यांच्याकडून उल्लेख. महाराजांच्या पुतळ्यात पण पैसे खायचं काम केलं.... भ्रष्टाचार कुठल्या पातळीवर पोचला हे याच उदाहरण - शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नेव्ही कडून तयार केला असं सरकार कडून सांगण्यात आलं..... वारा जास्त आल्यामुळे पुतळा पडल्याचे राज्यसरकार सांगतात.. गेट वे ऑफ इंडिया च्या शेजारी उभा असलेल्या पुतळ्याला कडधी धक्का बसला नाही....आणि सिंधुदुर्ग मधला पुतळा वाऱ्याने पडला सांगतात - ? कराड चिपळूण मार्गाच्या अवस्थेवरुन शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका - आयुष्यात अश्या पद्धतीचा रस्ता पहिला नाही - शरद पवार. एखादा पेशंट हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला तर तो हॉस्पिटल मध्ये पोचणार नाही. - शरद पवार तीन वेळा दुरुस्त करून रस्त्याची दयनीय अवस्था....शरद पवार पुण्यात ज्या खड्ड्यात ट्रक पडला तो रस्ता हल्ली तयार केलेला.... याचा अर्थ स्पष्ट आहे, भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेला नाही - शरद पवार सत्ता येते आणि जाते...ती येते तेव्हा पाय जमिनीवर ठेवायचे असतात. नसेल तेव्हा चिंता करायची नसते नारायण राणे यांच्यावर शरद पवार यांची टीका - नारायण राणेंचे चिरंजीव ज्या पद्धतीने वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्री याच्या पुढच्या पिढीने केलेली नाही शरद पवार यांची नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर थेट टीका.... सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय. ज्यावेळी सत्ता डोक्यात जाते तेव्हा त्यांना भानावर आणावं लागत प्रधान मंत्र्यांच्या काश्मीर दौऱ्यावर शरद पवार यांची टीका. काश्मीर मध्ये जाऊन काँग्रेस वर टीका करणाऱ्या मोदींना पार्लमेंट मध्ये विनंती करणार.... काँग्रेस ने देशासाठी काय केलं याची आठवण करून देणार इंदिरा गांधींच्या आठवणींना शरद पवार यांचा उजाळा...देत मोदींना केलं लक्ष देशासाठी ज्या गांधी कुटुंबातील लोकांची हत्या झाली त्या काँग्रेस बद्दल मोदी म्हणतात की काँग्रेस ने काय केलं देशाचे प्रधानमंत्री चुकीच्या पद्धतीने वक्ताव्य करतात... चारसो पार म्हणणाऱ्या मोदींना जनतेनं 240 जागा दिल्या.... आज नितिश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या दोन पक्षांची मदत घेतली नसती तर सरकार बनल नसतं. तरीही यांना अजून समज येत नाहीये - शरद पवार महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगली साथ दिली - शरद पवार प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर महाविकास आघाडीसोबत राहा... कोकणासाठी काहीतरी करायची चर्चा या आधी व्हायची... कोकणचा चेहरा बदलायचा असेल तर कोकणात कारखानदारी, फलोत्पादन व्यवसाय विकसित व्हायला पाहिजे