Sharad pawar On Balasaheb Thorat : धर्माधर्मात, जातीजातीत तेढ निर्माण करु नका : शरद पवार
Sharad pawar On Balasaheb Thorat : धर्माधर्मात, जातीजातीत तेढ निर्माण करु नका : शरद पवार
निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. तशी माझ्या पक्षाची भूमिका आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. माध्यमाला मुलाखत देताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी घेतलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न त्यांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, "निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्रित बसू. ज्यांच्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडायला सांगू आणि त्याला आम्ही पाठिंबा देऊ. ही माझ्या पक्षाची भूमिका आहे."