Sharad Pawar Meet Eknath Shinde : पवार-शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट, गेल्या 8 दिवसातली दुसरी भेट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Eknath Shinde Meet : पवार-शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट, गेल्या 8 दिवसातली दुसरी भेट
शरद पवारांनी आज वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलीय.. गेल्या ८ दिवसातली पवार-शिंदेंमधली ही दुसरी भेट आहे...पण या भेटीमुळे महाविकास आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर आलेत. कारण एकीकडे उद्धव ठाकरे यांचा धारावी प्रकल्पाला विरोध आहे. तर दुसरीकडे पवारांनी मात्र शिंदे यांच्यासोबत धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत बैठक घेतल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. यावेळी शरद पवारांसोबत अदानी कंपनीचे दोन अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर धारावी प्रकल्पाबाबत सादरीकरण झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. याबद्दल एबीपी माझानं शऱद पवार यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी ही चर्चा फेटाळून लावलीय. केवळ आपल्या कामासाठी शिंदेंची भेट घेतली, आपण गेल्यानंतर अदानीच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली असावी, असं पवार म्हणाले...