Maharashtra Politics: 'परिस्थितीनुसार जिल्हा पातळीवर निर्णय घ्या', शरद पवारांचे आदेश

Continues below advertisement
बीडमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक नेत्यांना मोर्चेबांधणीचे आदेश दिले आहेत. 'निवडणुका लढत असताना महाविकास आघाडी म्हणूनच समोर जायचंय, परंतु परिस्थितीअनुसार आपण जिल्हा पातळीवरती तो निर्णय घ्यावा,' असा महत्त्वपूर्ण आदेश शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र वस्के यांनी मुंडे बंधू-भगिनी (पंकजा आणि धनंजय मुंडे) एकत्र लढल्यास पक्षाला फायदा होईल, असे विधान करून नव्या राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola