Sharad Pawar Full PC : वंचितबाबत अद्याप निर्णय नाही : शरद पवार Kolhapur

Sharad Pawar In Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वंचित बहुजन आघाडीवर भूमिका स्पष्ट केली. आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा केलेली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते म्हणाले की,आम्ही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. मात्र, आमची वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला. ते म्हणाले की तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola