Sharad Pawar Full PC : जरांगेंसंदर्भातील प्रत्येक आरोप खोडला...म्हणाले, हा सत्ताधाऱ्यांना पोरकरटपणा

Continues below advertisement

पुणे: मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केल्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी आजपर्यंत मी एकही शब्द बोललेलो नाही. आमची कोणतीही भेट झालेली नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे बोलविते धनी असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फटकारले. जबाबदारीच्या पदावर बसलेली लोकं इतकं पोरकट बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात कधीच पाहिले नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram