Sharad Pawar Full PC : लोकांना बदल हवाय, हे स्पष्ट, बदलासाठी सर्वपक्षीयांना एकत्र यावंच लागेल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Press Conferance: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasaba Bypoll) भाजपच्या हेमंत रासनेंचा (Hemant Rasne) पराभव करुन निवडून आलेल्या रविंद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची (NCP Chief Sharad Pawar) भेट घेतली. धंगेकरांनी कसब्यात रासनेंचा पराभव करुन ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल 28 वर्षांनी भाजपच्या ताब्यातून कसब्याचा गड काँग्रेसच्या (Congress) धंगेकरांनी हिसकावला. पण कसब्यात धंगेकर विजयी होतील याची खात्री शरद पवारांना नव्हती. स्वतः शरद पवारांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलं आहे. त्यासोबतच कसब्यात मविआची एकजूट दिसली. भाजपचा कसबा गड ढासळला. भाजपनं कसब्यात बापट, टिळकांना डावलून निर्णय घेतले, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यासोबतच जनतेला बदल हवा आहे, बदलासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे.