Pawar Politics: काका-पुतणे पुन्हा एकत्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा

Continues below advertisement
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) येथे झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एकत्र आले. 'उपमुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे या शेतकऱ्यांना जाऊन भेटणं आणि त्यांच्याकडे योग्य ती मदत पोहोचवणं,' अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांना पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. या बैठकीत राज्यातील साखर कारखान्यांचे पदाधिकारी उपस्थित होते आणि आगामी हंगामाविषयी चर्चा झाली. प्रामुख्याने, मराठवाड्यातील पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा चर्चेत होता. अनेक शेतकऱ्यांपर्यंत अद्याप मदत पोहोचली नसल्याने शरद पवारांनी अजित पवारांना वैयक्तिक लक्ष घालण्यास सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola