Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात

Continues below advertisement

Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात

 राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आज बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वन पर भेट घेतल्यानंतर परभणीकडे निघत असताना शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. शरद पवारांचे वाहन पुढे गेल्यानंतर ॲम्बुलन्सने अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर धडकल्या. यात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गाडीचा देखील समावेश होता. मात्र सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. परंतु गाड्यांचे नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. दरम्यान आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट आज सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. 

शरद पवार म्हणाले, या हत्येने सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा धक्का बसलाय. बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात एक लौकिक आहे. मी अनेक वर्षापासून या ना त्या निमित्ताने या जिल्ह्याची संबंधित आहे. वारकरी संप्रदाय हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. त्या वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आपले आयुष्य जगणारे, दुष्काळ काळात त्याला तोंड देणारे, महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणारे आणि त्याप्रती कष्ट करणारे कुणी आहेत हा प्रश्न विचारला तर बीडचा उल्लेख हा केला जातो. अशा जिल्ह्यात जे काही घडलं हे कोणालाही न पटणारं, न शोभणारं अतिशय चमत्कारीक कशा प्रकारचं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram