Sharad Pawar: यूपीत राष्ट्रवादी आणि समाजवादीची युती, शरद पवारांकडून स्पष्ट ABP Majha
Continues below advertisement
पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून पाचपैकी तीन राज्यात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत युती करणार तर गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement