Zero Hour : 'आजच हिंदुत्वाचा कळवळा का?'; Congress चे रत्नाकर महाजन यांचा Medha Kulkarni यांना सवाल

Continues below advertisement
पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या (Shaniwar Wada) आवारात कथित नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादात आता काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन (Ratnakar Mahajan) आणि भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यात राजकीय जुंपली आहे. 'आजच असं काय झालं की एकदम हिंदुत्वाचा अभिभाव जागा झाला,' असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी विचारला आहे. तर दुसरीकडे, हिंदुत्ववादी संघटनांनी या जागेवर आक्षेप घेत ती अनधिकृत असल्याचा दावा केला आहे. या जागेची पुरातत्व खात्याकडे (ASI) कोणतीही नोंद नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. पुरातत्व विभागाने याप्रकरणी अज्ञात महिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी ही मजार १९३६ पासून अस्तित्वात असल्याचा दावा केल्याचे म्हटले जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola