Sushma Aandhare : जैन बोर्डिंग हाऊसवरुन लक्ष विचलित करण्यासाठी राडा;अंधारे,जलील यांचा आरोप

Continues below advertisement
पुण्यातील शनिवारवाडा (Shaniwar Wada) नमाज पठणाच्या वादावरून राजकारण तापले असून, या प्रकरणात आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचेही नाव आले आहे. 'केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोल यांचा पाय जैन ट्रस्टच्या जमिनीच्या विषयात खोलात जात असल्याने, त्यांना मदत करण्यासाठी आणि विषय डायव्हर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक मेधाताई Kulkarni आत्ता हा सगळा आकांडतांडव करताहेत', असा थेट आरोप शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. या वादात उडी घेत AIMIM खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनीही हा वाद म्हणजे मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा RSS चा डाव असल्याचा आरोप केला. 'हे नवीन चिंकू-पिंकू जे आले आहेत, ते हिंदुत्वाचा सगळा भार आपल्या खांद्यावर आहे असे दाखवत आहेत', अशा शब्दांत त्यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यावर टीका केली. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain Boarding House) जागेच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठीच शनिवारवाड्यातील नमाजाचा मुद्दा उकरून काढल्याचा दावा अंधारे आणि जलील दोघांनीही केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola