Morning Prime Time : 7 AM : सुपरफास्ट बातम्या : 22 OCT 2025 : ABP Majha

Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचे नाव समोर आल्याने सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पाईप जो खोलात जात आहे, त्यांना मदत करण्यासाठी आणि जैन ट्रस्टच्या जमिनीचा विषय डायवर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक मेधाताई आता हा सगळा आकांतांडव करताहेत', असा थेट आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. दुसरीकडे, हा व्यवहार पूर्णपणे रद्द करावा, अन्यथा मोहन भागवत आणि अमित शहा यांच्यापर्यंत जाईन, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. या आरोपांमुळे शनिवारवाडा नमाज पठणाचा मुद्दाही चर्चेत आला असून, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी उत्तर देताना हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला आहे. यासोबतच, राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने दिवाळीच्या उत्साहावर पाणी फेरले असून हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, नागपुरातील रिलायन्स मार्टसह विविध ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola