Shambhuraj Desai Vs Chhagan bhujbal : भुजबळांच्या विधानावर मंत्री शंभूराज देसाईंचा कडाडून हल्लाबोल

Continues below advertisement

Shambhuraj Desai Vs Chhagan bhujbal : छगन भुजबळांच्या विधानावर मंत्री शंभूराज देसाईंचा कडाडून हल्लाबोल 
मुंबई: राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणावरुन (Maratha reservation) घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर, आता महायुतीतील नेत्यांमध्ये वादावादी सुरु झाली आहे. छगन भुजबळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लक्ष घालावं, अशी आक्रमक भूमिका उत्पादन शुल्क मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी घेतली. सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करत, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसींनी रस्त्यावर उतरुन विरोध करावा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं होतं. पुढच्या दाराने आरक्षण मिळत नाही, त्यामुळे ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) म्हणजे मागच्या दारातून वाट मिळवण्याचा प्रयत्न आहे. तसंच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना न्यायाधीश जाऊन भेटतात त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही असंही भुजबळ म्हणाले होते.  त्याला शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram