Shambhuraj Desai Meet Manoj Jarange : सरकारच्या वतीने शंभूराज देसाई मनोज जरांगेंना भेटणार

Continues below advertisement

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीमध्ये सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी उपचार घेतले होते. पण सरकार जोपर्यंत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरावाली सराटी (Antarwali Sarati ) येथे दाखल होणार आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं समजतेय. 

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याबाबत (Kunbi Maratha)चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. आज सरकारचे शिष्टमंडळ आंतरावली सराटीमध्ये दाखल होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई येणार आहेत. दुपारी एक वाजता शंभूराजे देसाई मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या मागण्याबाबत ते चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी शंभूराजे देसाई प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, याआधी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगे यांच्या भेटीला आले होते. त्यांच्या शिष्टाईनंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले होते. आता शंभूराज देसाई चर्चेसाठी जालनामध्ये येणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram