Shaina NC Meets Raj Thackeray : विधानसभेसाठी मोठी खेळी? शायना एनसी राज ठाकरेंच्या भेटीला
Shaina NC Meets Raj Thackeray : विधानसभेसाठी मोठी खेळी? शायना एनसी राज ठाकरेंच्या भेटीला
बादेवीच्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी राज ठाकरेंच्या भेटीला राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर शायना एन सी दाखल मुंबादेवीतून शायना एन सी शिवसेनेच्या उमेदवार आहेत या परिसरात मनसे कडून पाठिंबा मिळावा या अनुशंगाने राज ठाकरेंच्या भेटीसाठी आल्या असण्याची शक्यता..
हे ही वाचा...
माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मार्ग निर्धोक करण्यासाठी महायुतीच्या गोटात जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी गुरुवारी रात्री शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर महायुतीचे नेते बंडखोरांची समजूत काढण्याच्या कामाला लागले होते. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सदा सरवणकर यांची समजूत काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहीममध्ये अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, असे महायुतीमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. आशिष शेलार, नितेश राणे, दीपक केसरकर यांनी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, सदा सरवणकर हे आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडायला तयार नाही. चर्चा करायची वेळ आता निघून गेली, मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी घेतली होती. मात्र, सदा सरवणकर यांच्याशी सतत चर्चा करुन माहीममधून माघार घ्यावी, यासाठी अजूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आता सदा सरवणकर हे खरोखरच माहीम मतदारसंघावरचा दावा सोडणार का, हे पाहावे लागेल. तसे करताना कोणती राजकीय तडजोड होणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.