Maratha Reservation प्रश्नी केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल ; छत्रपती शाहू महाराज

Continues below advertisement

कोल्हापूर : "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं," अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी वक्त केली. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात निकाल लागला आहे. आता त्याच ठिकाणाहून आपण सुरुवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. इतक्या घटना दुरुस्त्या केल्या मग आता का करत नाही हे समजत नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान यांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे."

कोल्हापुरात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वातील मराठा समाजाच्या या मूक मोर्चात राज्यभरातील मराठा समन्वयक सहभागी झाले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर होते. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली होती. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापलं मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका मांडली.

मूक आंदोलनात सहभागी झालेल्यांना संबोधित करताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं. सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात निकाल लागला आहे. आता त्याच ठिकाणाहून आपण सुरुवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. इतक्या घटना दुरुस्त्या केल्या मग आता का करत नाही हे समजत नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान यांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram