Shahu Maharaj Kolhapur: कोल्हापूर पूरस्थितीला काही नैसर्गिक काही मानवनिर्मित कारणं जबाबदार

Continues below advertisement

Shahu Maharaj Kolhapur: कोल्हापूर पूरस्थितीला काही नैसर्गिक काही मानवनिर्मित कारणं जबाबदार

ही बातमी पण वाचा

Kolhapur Flood Update : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद? सर्व मार्ग एका क्लिकवर

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 11 राज्य मार्ग व 37 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 48 मार्ग बंद झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवर असल्याने 95 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

करवीर तालुक्यातील कोणते मार्ग

शाहू नाका कळंबे साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर, चिखली, राष्ट्रीय महामार्ग क्र. 204 वडणगे निगवे दुमाला, शिये टोप राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ला मिळणारा ते एमआयडीसी पूल कसबा बावडा रस्ता रामा 194 वर शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी आंबेवाडी, चिखली मार्गे वाहतुक सुरु. तसेच शिये कसबा बावडा रस्त्यावर महानगरपालिका हद्दीत पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग शिये फाटा राष्ट्रीय महामार्ग शिरोली नाका, कोल्हापूर मार्गे सुरु.

कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज- नागणवाडी-चंदगड-हेरे तिलारी मार्गावर चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद.  पर्यायी मार्ग हलकर्णी फाटा दाटे मार्गे चंदगड मार्गे वाहतुक सुरु. 

गडहिंग्लज - कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज- नागणवाडी-चंदगड-हेरे तिलारी रस्ता बंद. पर्यायी गिजवणे, बेळगुंदी, इंचनाळ, गजरगाव, महागावमार्गे वाहतूक सुरु.

राधानगरी- देवगड-राधानगरी-मुरगुड-निपाणीवर मुरगूडजवळ 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद. पर्यायी रस्ता मुरगुड चिमगाव मार्गे गारगोटी व कोल्हापूर तसेच निढोरी कागल.

चंदगड- चंदगड-हिंडगाव-इब्राहिमपूर चितळे- आजरा रस्त्यावर इब्राहिमपूर पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. पर्यायी कुरणी गवसे इब्राहिमपूर अडकूरमार्गे वाहतुक सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram