Martyr Sangram Patil | कोल्हापूरचे वीरपुत्र शहीद संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
किस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे वीरपुत्र संग्राम पाटील यांना आज (23 नोव्हेंबर) अखेरचा निरोप देण्यात आला. निगवे खालास या त्यांच्या मूळगावी त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संग्राम पाटील यांच्या आठ वर्षांच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. आमदार ऋतुराज पाटील संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित होते.
संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. 21 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. संग्राम पाटील यांच्या पश्चात आई-वडील, धाकटा भाऊ, धाकटी बहिण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.