School Reopen | राज्याच्या ग्रामीण भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरु;पुण्याच्या ग्रामीण भागातून आढावा

Continues below advertisement
राज्य सरकारच्या परवानगीनंतर राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयं आजपासून सुरु झाली आहेत.  नववी आणि बारावीच्या वर्गांना आजपासून सुरुवात झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये शाळा सुरु होणार नाहीत. ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि अमरावतीमधील शाळा आजपासून सुरु होत आहेत. दरम्यान शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अनेक शिक्षक कोरोनाबाधित असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे शिक्षक, पालक संघटनांकडून शाळा सुरु करु नये अशी मागणी करण्यात येत आहे. तरी शाळा सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram