Pushkar Fair 2025: '१५ कोटी किंमत, ९ कोटींची ऑफर', Shahbaz घोड्यासमोर Mercedes, Rolls Royce फिक्या
Continues below advertisement
राजस्थानच्या अजमेरमधील पुष्कर येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय पशु मेळ्यात (Pushkar Animal Fair) पंजाबमधून आलेला 'शाहबाज' (Shahbaz) नावाचा घोडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या घोड्याची किंमत मर्सिडीज (Mercedes) आणि रोल्स रॉयस (Rolls Royce) यांसारख्या गाड्यांपेक्षाही जास्त असल्याचे म्हटले जात आहे. घोड्याचे मालक, गॅरी गिल यांनी सांगितले की, 'हमने १५ करोड़ रुपये इसका आस्किंग प्राइस रखा है और काफी अच्छी ऑफर पेश की हुई भी है। लगभग नौ करोड़ रुपये ऑफर दिया है'. शाहबाज हा आतापर्यंत अनेक शो जिंकलेला घोडा आहे. पुष्करमध्ये जेव्हा तो लहान होता, तेव्हा त्याने एका स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले होते. मालकाने सांगितले आहे की, त्यांना सध्या घोडा विकायचा नाही, पण त्याची किंमत १५ कोटी रुपये ठेवली आहे. त्यांना आधीच ९ कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे, परंतु शाहबाजची पिल्ले (foals) झाल्यावरच विक्रीचा विचार केला जाईल, असे मालकाने स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement