Shahapur Poision : 101 विद्यार्थ्यांना गुलाबजाममधून विषबाधा, शहापूरच्या आश्रमशाळेतील घटना
शहापूर तालुक्यातल्या भातसई इथल्या आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा झालीय. एकूण १०९ विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होतोय. ४६ विद्यार्थी आणि ६३ विद्यार्थिनी आजारी पडल्या आहेत. सर्व विद्यार्थी हे ७ ते १५ वयोगटातले आहेत. उत्तरकार्याचं जेवण आश्रमशाळेत नेऊन दिल्यावर त्यातला पुलाव आणि गुलाबजाम खाऊ मुलांच्या तब्येतीत बिघाड झाला. उलटी, मळमळ, पोटदुखी हे त्रास सुरू झाले. मुलांवर उपजिल्हा रूग्णालय इथे उपचार सुरू आहेत. या आश्रम शाळेत एकूण 96 मुलं मुली शिकत असून 65 ते 70 विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आला आहे