Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्य

Continues below advertisement

महाविकास आघाडीमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून १२ पोस्टर लागतात, पण एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, आमदार शहाजी बापू पाटलांचा विरोधकांना टोला.

सांगली : महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्र्यांचे दहा-बारा पोस्टर्स लागतात, पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात तिळमात्र शंका नाही असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं. ठाकरे गटाचे नेते आमच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप करतात, पण आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही असंही ते म्हणाले. विट्यामध्ये टेंभू योजनेच्या कार्यक्रमाच्या शुभारंभी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. खानापूर-आटपाडीचे माजी आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न असलेल्या टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचा मुख्यमंत्रीनी शुभारंभ केला. 

आम्हाला 50 खोके मिळाले नाही

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की शिंदेंसोबतच्या आमदारांना 50 खोके भेटले. आम्हीपण आमच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगू की आम्हाला 50 खोके भेटले नाहीत. उठ सुट 50 खोके आम्हाला मिळाले असे ओरडत आहेत. पण पन्नास खोक्यांचा आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही. 

आम्ही जर गुहावाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला पैसे भेटले असते का? असा सवाल यावेळी शहाजीबापू पाटील यांनी विचारला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram