Shabana Azmi | ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी रस्ते अपघातात जखमी | ABP Majha
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला मोठा अपघात झालाय. या अपघातात शबाना आझमी जखमी झाल्या आहेत.. मुंबईहून पुण्याला जाताना खालापूर टोलनाक्याजवळहा अपघात झालाय. शबाना आझमी यांच्या नाकाला आणि तोंडाला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय.. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला शबाना आझमी यांच्या कारनं धडक दिल्यानं हा अपघात घडलाय,.अपघातावेळी जावेद अख्तर यांची कार शबाना यांच्या वाहनामागे होती अशी माहिती मिळतेय. दरम्यान नवी मुंबईतील रूग्णालयातून शबाना यांना कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.