Cyrus Poonawalla : सायरस पूनावालांचा 'डोस', म्हणाले, राजकारणी थापा मारतात, लशीचं कॉकटेल अयोग्य
Continues below advertisement
राजकारणी थापा मारतात. महिन्याला दहा किंवा अकरा कोटी लसीचे डोस देणे अवघड. लसीच्या किमतीत बदल झाल्याने सीरमचा नफा मोठ्या प्रमाणात बुडाला पण भारतातील लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही तो सहन केला.कोव्हीशील्ड लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातील एन्टीबॉडीज कमी होतात असा रिपोर्ट लॅन्सेटधे छापून आलाय....ते खरे आहे. त्यामुळेच तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा. मी स्वतः तिसरा बुस्टर डोस घेतलाय.मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालुन अतिशय वाईट गोष्ट केलीय. माझा मुलगा मला म्हणाला की यावर तोंड उघडू नका पण मी यावर बोलणार आहे. कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील एकशे सत्तर देशांना लस पुरवते. पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बिल गेट्सने पाच हजार कोटी रुपये दिलेत.
Continues below advertisement