
Rahul Shevale : राहुल शेवाळेंकडून Manisha Kayande यांच्यावर गंभीर आरोप, उपमुख्यमंत्र्यांना पत्र
Continues below advertisement
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांच्याविरोधात तक्रार केलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेला पत्रात त्यांनी मनीषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका ज्येष्ठ नेत्यासोबत २००७ मध्ये लग्न करूनही २०११ साली लैंगिक शोषणाची तक्रार केली. त्यानंतर संबंधित नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप शेवाळे यांनी केलाय. त्याचसोबत मनीषा कायंदे यांनी संबंधित नेत्याकडून घर, वडिलांचा दवाखाना तसेच दुकानांचं फर्निचर करून घेतल्याचा आरोप शेवाळे यांनी पत्रातून केलाय. त्याचप्रमाणे कुप्रसिद्ध गुंड डी. के. राव याच्या मदतीने संबंधित ज्येष्ठ नेत्याला धमकावलं आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही राहुल शेवाळे यांनी केलीय.
Continues below advertisement
Tags :
Marriage Complaint Blackmail Thackeray Sexual Abuse Deputy Chief Minister Devendra Fadnavis Devendra Fadnavis MLA Manisha Kayande Shinde Senior Leader Khasdar Rahul Shewale Serious Allegation Notorious Goon D. K. Rao