Jitesh Antapurkar | वृत वाहिन्यांचे कॅमेरे पाहून आमदार जितेश अंतापूरकर यांनी काढला पळ
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitesh Antapurkar | वृत वाहिन्यांचे कॅमेरे पाहून आमदार जितेश अंतापूरकर यांनी काढला पळ
काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी अक्षरशः पळ काढला.. माध्यम प्रतिनिधींनी पाठलाग करत त्यांची प्रतिक्रिया मिळवली.. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीत जितेश अंतापुरकर त्यांनी क्रॉस कोटिंग केल्याचा आरोप आहे . शिवाय चार दिवसांपूर्वी जितेश अंतापुरकर यांनी मुंबईत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती . त्यामुळे जितेश अंतापुरकर हे भाजपा जाणार असल्याची चर्चा होती .. आज नांदेड मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जितेश अंतापुरकर आले होते.. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यम प्रतिनिधींनी जितेश अंतापुरकर यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला .. मात्र वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पाहून जीतेश अंतापुरकर त्यांनी पळ काढला त्यांचा पाठलाग करत, माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गाठलं .. दरम्यान आरोप हे होत असतात असं उत्तर त्यांनी .. माझ्यावरती झालेल्या आरोपांबाबत मी सविस्तर बोलणार असल्याचे हितेश अंतापुरकर यावेळी म्हणाले .. क्रॉस कोटींच्या आरोपाबाबत आपण पुराव्यानिशी बोलू असा अंतापुरकर म्हणाले. अशोक चव्हाण यांची भेट ही विकास कामं बाबत , माजी आणि चव्हाण साहेबांचे कौटुंबिक संबंध आहेत . ते जिल्ह्याचे नेते आहेत . त्यामुळे भेट घेऊन त्यांच्यासोबत विकास कामांवर चर्चा केली असं जितेश अंतापुरकर म्हणाले. आपण काँग्रेसमध्ये आहात का असं विचारलं असता निश्चित मी काँग्रेसमध्येच आहे असं उत्तर जीतेश अंतापुरकर यांनी दिले ..