Secular Code : समान नागरी कायद्याऐवजी सेक्युलर शब्दाचा उल्लेख का?
Secular Code : समान नागरी कायद्याऐवजी सेक्युलर शब्दाचा उल्लेख का?
सेक्युलर सिविल कोड आणि युनिफॉर्म सिविल कोड मध्ये कोणताही अंतर नाही, दोन्ही एकच.... ज्येष्ठ कायदे तज्ञ जुगलकिशोर गिल्डा यांची माहिती.. सरकारने युनिफॉर्म सिविल कोड लागू करावं, हे 1973 पासून अनेक वेळेला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.. युनिफॉर्म सिविल कोड विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका गेल्यास न्यायालय त्यांना फारसा महत्त्व देणार नाही असाही गिल्डा यांचा दावा... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सुतोवाच केलेला सेक्युलर सिविल कोड आणि आजवर चर्चेत असलेला युनिफॉर्म सिविल कोड यात कोणताही फरक नाही... फक्त शब्दांचा अंतर असल्याचे मत ज्येष्ठ कायदे तज्ञ एडवोकेट जुगलकिशोर गिल्डा यांनी व्यक्त केला आहे.. 1973 पासून वेगवेगळ्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एकदा नव्हे, तर अनेक वेळेला स्पष्ट केले आहे की राज्यघटनेचे कलम 44 म्हणजेच युनिफॉर्म सिविल कोड लागू करणे ही सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे, आणि आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही.. त्यामुळे सरकारनं सेक्युलर सिव्हिल कोड या नावाने समान नागरी कायदा केला, तरी त्या विरोधातील याचिकांना सर्वोच्च न्यायालय मध्ये फारसा महत्त्व मिळणार नाही असं ही गिल्डा म्हणाले.. असे असले तरी विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहात अगदी साध्या बहुमताने जो समान नागरी कायदा करता येऊ शकतो, तो कायदा करण्याची तयारी विद्यमान केंद्र सरकार दाखवेल का याबद्दल साशंकता असल्याचे गिल्डा म्हणाले... दरम्यान देशात समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम पारसी आणि ख्रिश्चन धर्मातील काही कायदे अस्तित्वात राहणार नाहीत अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासीं च्या परंपरांशी संबंधित काही नियमही बदलावे लागतील अशी माहिती गिलडा यांनी दिली...