School Uniform Sting Operation : शाळा म्हणायचं की दलाल? पालकांनो , हे बघा खळबळजनक स्टिंग ऑपरेशन

आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी पालक जीवाचं रान करतात. कधी ओव्हारटाईम करून तर कधी काटकसर करून आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च ते करत असतात. पण शिक्षणाच्या नावाखाली याच पालकांची कशी लूट होते, ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शाळेचा गणवेश विशिष्ठ दुकानातूनच घ्यायचे अशी सक्ती अनेक शाळांकडून केली जाते. पण यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? एकच कारण आहे, आणि ते म्हणजे कमिशन. गणवेश विक्रेते या शाळाचालकांना १० टक्के कमिशन देतात. वर्षाला हजारो गणवेशांचा खप होतो. त्यामुळे कमिशनचा हा खेळ कोट्यवधींमध्ये जातो. या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी माझानं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टिंग ऑपरेशन केलं. आणि यामध्ये हे सगळं धक्कादायक वास्तव समोर आलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola