विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित रुग्ण असताना शाळकरी मुलाकडून स्वछतागृहांची साफसफाई, बुलढाण्यातील प्रकार
बुलढाणा : जगात कोरोनाने हाहाकार माजविला असताना तिसरी लाट येणार असल्याचं तज्ञाच मत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याचंही भाकित तज्ज्ञांनी वर्तवलं आहे. असं असताना बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात 15 कोरोनाबाधित रुग्ण असताना तेथील स्वछता गृह एका चिमुरड्या 8 वर्षाच्या मुलाकडून हाताने साफसफाई करून घेण्यात आले. विशेष म्हणजे या मुलाला साफसफाई करण्यासाठी धमकविण्यात आलं. यामुळे या परिसरात प्रशासना विरोधात संतापाची लाट आहे.