Maharashtra School : राज्यात पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरु होण्याची शक्यता, कधी सुरू होणार शाळा
येत्या 10-15 दिवसात पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळांबाबत निर्णय होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालच्या बैठकीत सर्व शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरु लागल्यानं शाळा सुरु करण्याबाबत राज्यभरातून दबाव वाढत आहे. सध्या मुख्यमंत्री मानेवरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढे काही दिवसात शाळांबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं कळतंय.