शाळांवरील कारवाईवरुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - राज्यमंत्री बच्चू कडूंमध्ये संघर्ष

Continues below advertisement
बेकायदा फी वसूल करणाऱ्या शाळांची तपासणी करण्याच्या राज्यमंत्री बच्चू कडूंच्या आदेशानंतर कॅबिनेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची शाळांची तपासणी स्थगित करण्याबाबत बैठक बोलविल्यानंतर व तसे पत्रक काढल्यानंतर प्रहार संघटना, त्यासोबत तक्रारदार पालक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सेंट जोसेफ पनवेल आणि सेंट फ्रान्सिस स्कूल नाशिक या शाळांचे शैक्षणिक आणि आर्थिक ऑडिट करण्याचे बच्चू  कडू यांनी 9 सप्टेंबर रोजी पालकांसोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आदेश दिले होते. मात्र, आता या शाळांच्या तपासणीबाबत स्थगितीसाठी विशेष बैठक बोलविल्याने, विद्यार्थी आणि पालकांपेक्षा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना संस्थाचालकांचा कळवळा आहे का? असा प्रश्न प्रहार संघटनेने विचारला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram