school close : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील पहिली ते नववीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Continues below advertisement
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील पहिली ते नववीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय अकरावीचे वर्गही 31 जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबई लगतच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही महापालिकांनी हा निर्णय घेतलाय. शिवाय दुसरीकडे राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून घेण्यात आलाय.. शिवाय राज्यातल्या शाळांवरही बैठकीत चर्चा झाली.. त्यामुळे राज्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे इतर जिल्ह्यातील शाळांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागलंय
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या School Close 12th Std ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv 10th Std