School Bus Fare Hike : पालकांसाठी महत्त्वाची बातमी, स्कूल बस फी वाढण्याची शक्यता ABP Majha

Continues below advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यात. त्यामुळे पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी अनेक पालक दारात स्कूल बस येण्याची वाट पाहतायत..मात्र आता स्कूल बस पालकांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. पाच राज्यातल्या निवडणुका संपल्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ होणार असल्याची भीती व्यक्त होते. त्यामुळेच स्कूल बसमालकही स्कूल बस फी वाढवण्याच्या विचारात आहे. फीमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा विचार स्कूल बस मालक करतायत. त्यामुळे पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर स्कूल बस फी वाढण्याची शक्यता आहे.  येत्या १ एप्रिलपासून १०० टक्के स्कूल बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram