Narendra Modi Scheme : 'फडणवीस सरकारनं Modi Birthday च्या 10 योजना बंद केल्या', दानवेंचा आरोप

Continues below advertisement
माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी फडणविस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, 'फडणविस सरकारनं Modi Birthday च्या 10 योजना बंद केल्या'. या योजनांची यादीही दानवे यांनी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी या योजना सुरू केल्या होत्या, मात्र आता त्या बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये नमो महिला सशक्तीकरण योजना, नमो कामगार कल्याण योजना, नमो शेततळा अभियान, नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो क्रीडा मैदान व उद्यान योजना, नमो शहर सौंदर्गीकरण योजना आणि नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना यांचा समावेश आहे. दानवे यांनी 'Balasaheb च्या वाढदिवशी योजना का नाही?' असा सवालही उपस्थित केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola