Deepak Londhe Nashik : आरोपी प्रकाश लोंढे, दीपक लोंढेच्या अनधिकृत इमारतीवर हातोडा
Continues below advertisement
नाशिक (Nashik) शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी 'उत्तर प्रदेश पॅटर्न' (Uttar Pradesh Pattern) राबवत मोठी कारवाई केली आहे. सातपूर गोळीबार प्रकरणातील (Satpur Firing Case) आरोपी आणि आरपीआयचे पदाधिकारी प्रकाश लोंढे (Prakash Londhe) व त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांच्या अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. 'गुन्हेगारांचं साम्राज्य उध्वस्त करावं यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जात असून, त्यामध्ये नाशिक महानगरपालिका देखील सहभागी होत आहे,' अशी माहिती समोर आली आहे. सातपूर परिसरात नंदिनी नदीच्या पूररेषेमध्ये ही दोन मजली अनधिकृत इमारत उभारण्यात आली होती. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वीच लोंढे यांच्या दुसऱ्या एका कार्यालयात घातक शस्त्रे आणि एक गुप्त भुयार सापडले होते, ज्याचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी होत असल्याचा संशय आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement