Mumbai Satyacha Morcha : मतदार याद्यांमध्ये घोळ, महाविकास आघाडी आणि मनसे रस्त्यावर
Continues below advertisement
मतदार यादीतील कथित घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसेने (MNS) मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला. या मोर्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते सहभागी झाले. 'उरलेले कोण एलियन्स येणार आहेत मतदान करायला?' असा संतप्त सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. ठाण्यातील एका ग्रामपंचायतीत लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त असल्याचा आणि एकाच गोडाऊनवर ५५० नावं नोंदवल्याचा आरोप त्यांनी केला. फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चासाठी अनेक नेत्यांनी वाहतूक कोंडी टाळता यावी म्हणून लोकलने प्रवास केला. दुसरीकडे, ऐनवेळी कार्यकर्त्यांना संदेश पाठवल्याने मुंबई काँग्रेसमधील गटबाजीची चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नसतानाही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement