Satyacha Morcha: उद्या मविआ आणि मनसेचा मुंबईत सत्याचा मोर्चा
Continues below advertisement
मुंबईत होणाऱ्या 'सत्याचा मोर्चा'वरून (Satyacha Morcha) विरोधी पक्षांमध्येच समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असले तरी, काँग्रेसने मात्र यापासून अंतर राखल्याचे चित्र आहे. 'बिहार निवडणुकीमुळे मनसेपासून काहीसं अंतर ठेवण्याचा तर प्रयत्न नाही ना,' अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसकडून केवळ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हेच उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या दोन नेत्यांवर उपस्थितीची जबाबदारी सोपवली आहे. दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता आहे, तर नाना पटोले हे देखील गैरहजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे ज्या आक्रमकतेने मोर्चाची तयारी करत आहेत, त्या तुलनेत काँग्रेसची भूमिका काहीशी बचावात्मक दिसत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement