EVM Row: 'आयुष्यभर EVM ला दोष देत रहाल', Pravin Darekar यांचा Raj Thackeray यांना टोला
Continues below advertisement
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर ईव्हीएम (EVM) संबंधित आरोपांवरून सडकून टीका केली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, 'जिंकले की लोकशाही जिंकते आणि हरले की इव्हीएम. किती दिवस असं चालणार? मला वाटतंय थोडं तरी आत्मपरीक्षण करा नाहीतर असेच त्याठिकाणी हरत राहाल आणि संपूर्ण आयुष्य या इव्हीएमलाच दोष देण्यात जाईल'. तर दुसरीकडे केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंच्या सादरीकरणाला 'खोदा पहाड, निकला चुहा' असं संबोधलं. उपाध्ये यांनी सवाल केला की, मतांच्या चोरीबद्दल ठोस पुरावे असते तर ते निवडणूक आयोगाकडे (Election Commission) किंवा न्यायालयात का सादर केले नाहीत? दोन्ही नेत्यांनी राज ठाकरेंना पराभवाची कारणे शोधण्याऐवजी जनता आपल्याला का नाकारत आहे यावर आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement