MPSC Results | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा प्रसाद चौगुले अव्वल!

Continues below advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौगुले हा राज्यात पहिला तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके हा मागासवर्गवारीत प्रथम तर अमरावतीची पर्वणी पाटील महिला वर्गवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे.

एपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी राज्यातील एकूण 6825 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामधून 1326 विद्यार्थी मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहेत. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात 420 जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना जर पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करायचा असल्यास त्यांनी निकाल लागल्यानंतरच्या 10 दिवसाच्या आतमध्ये ऑनलाईन पद्धतीने करावा असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram