Satara: प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा, 30 गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लाखांमध्ये उलाढाल ABP Majha
Continues below advertisement
दुष्काळातही स्ट्रॉबेरी बहरु शकते असं जर आम्ही तुम्हाला सांगतिलं तर तुमचा विश्वास बसेल का? साताऱ्यातील दुष्काळी खटाव तालुक्यात मात्र हे शक्य झालंय. सचिन कोचरेकर आणि प्रशांत भोसले या प्रयोगशील शेतकऱ्यांनी ही किमया साधली आहे. दुष्काळी पट्ट्यात अवघ्या 30 गुंठ्यांत हीच स्ट्रॉबेरी महिन्याकाठी पाच लाखांची उलाढाल करत आहे. थंड हवेत बहरणारी ही स्ट्रॉबेरी चक्क दुष्काळात बहरलेली आहेत. साताऱ्याच्या दुष्काळी खटाव तालुक्यातील हे चित्र नक्कीच सुखद धक्का देणारं आहे.
Continues below advertisement