Satara : साताऱ्याच्या 6 वर्षांच्या चिमुकलीचा मोठा पराक्रम, पारंपरिक पोषाखात लिंगाणा केला सर

Continues below advertisement

साताऱ्याच्या 6 व्या वर्षांत अजून एक पराक्रम महाराष्ट्रीयन पारंपरिक पोषाखात काष्टा साडी नेसून  एक हजार फुट उंचिचा लिंगाणा सर केला.समुद्र सपाटीपासून 3 हजार 100 फुट उंचीवर हा दुर्ग आहे. चढाई अतिशय दुर्गम असल्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्वात अवघड ट्रेकमध्ये याची गणना होते . कामेरीच्या आरोही सचिन लोखंङे. वय 6 वर्ष हिने नविन वर्षाची सुरुवात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजला जाणारा आणि गिर्यारोहण प्रेमींच्या मनात , विचार आला तरी अंगाला दरदरून घाम फोडणारा किल्ले लिंगाणा सर करून भारतीय ध्वजाला मानवंदना दिली.पाॅइंट ब्रेक एडव्हेंचर यांच्या मार्गदर्शनातून ही मोहीम पूर्ण करण्यात आली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram