Satara : खड्ड्यांचा महामार्ग, टायर पंक्चर करून घेण्यासाठी टोल भरायचा? पुणे-बंगळुरु महामार्गावर खड्ड्यात रस्ते
सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून जाणा-या पुणे बेंगलोर महामार्गावरच्या रस्त्यांची अवस्था म्हणजे मौत का कुवा असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वाहनांची चाकंच वाहनापासून लांब जाताना दिसतायत तर प्रत्येक वाहन चालक हा मृत्यूला स्पर्श करून येतोय असंच चित्र तयार झालंय. याच कारणातून वाहनचालकही अक्षरश: मेटाकुटीला आलाय हे समजतंय.