Satara News : साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील रोमनवाडी इथं बहिण भावाचा बुडून मृत्यू ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Jan 2022 10:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्याच्या पाटण तालुक्यातील रोमनवाडी इथं बहिण भावाचा बुडून मृत्यू झाला आहे. सौरभ पवार आणि पायल पवार असं त्या बहिण भावाचं नाव आहे. फार्म हाऊसच्या बाजूला खेळता खेळता शेततळ्यात पडून त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. शेततळ्यात पाय घसरून आधी सौरभ पडला. तो बुडत असल्याचे पाहून त्याची बहीण पायलनेही त्याला वाचवण्यासाठी उडी घेतली.. मात्र दोघंही बुडाले.. रात्री उशीरा या दोघांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळे आता शोककळा पसरली आहे.