361 मशालींनी उजळला किल्ले प्रतापगड, 'जय भवानी जय शिवाजी'चा जयघोष
प्रतापगडावरच्या देवीची प्रतिष्ठापणा करून आज 361 पुर्ण होत आहेत. अशावेळी गडावरील शिवभक्त प्रत्येकवर्षी एक मशाल वाढवून हा मसाल महोत्सवाच्या उजाळ्यात भर घालत असतात. गेली दोन वर्ष कोरोनाच्या कचाट्यात अडलेल्या या शिवभक्तांना यंदा मिळालेली ही सुट म्हणजे सर्वच शिवभक्त या गजरात तल्लीन झाले होते. यात महिला मुली आबालवृध्दही सहभागी झाले होते.